Close

EGS

बहिरेवाडी2

गाव अंतर्गत सीमेंट रस्ता, ग्रामपंचायत- बहिरेवाडी , तालुका – आजरा .जिल्हा- कोल्हापूर

वर्ष :- 2024-25

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्राम पंचायत साठी वरदान ठरली आहे . योजनेमुळे ग्रामपंचायत अंतर्गत पक्क्या सीमेंट रस्त्याची निर्मिती झालेली आहे .

पेरनोली1

मातोश्री पाणंद रस्ता, ग्रामपंचायत पेरनोली , तालुका – आजरा .जिल्हा- कोल्हापूर

वर्ष :- 2024-25

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे गावामध्ये तसेच शेती व्यवसायामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या भात ,ऊस, मका,सोयाबीन,भुईमूग , बांबू लागवड या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आपला शेतीमाल घरापर्यंत व बाजारात नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज होती ती रोजगार हमीच्या मातोश्री पाणंद रस्ता या योजने अंतर्गत मंजुरी मिळाली व रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना दळणवळणाचे साधन म्हणून पक्क्या रस्त्याची निर्मिती होत आहे.

Bamboo2

बांबू लागवड, शेणवडे येथे अशोक रामचंद्र पाटील यांचे शेतात बांबू लागवड

वर्ष :- 2020-21

कोल्हापूर ते गगनबावडा रस्या् पासून साधारण्त: 1.5किमी अंतरावर असणा-या पडीक जमीनीवर कोणतेही पीक येत नव्हते. सदरठिकाणी रानटी जनावरांचा मोठया प्रमाणात उपद्रव होता. त्यामुळे कोणतेही पीक घेताना अडचणीनिर्माण होत होत्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती मीळाल्यानंतर सदर लागेवर लाभार्थ्याने बांबू लागवड केलेली आहे. सदर लागवड करणेसाठील त्यांना 100% अनुदान प्राप्त झाल्यामुळे लाभार्थ्याला कोणताही खर्च करावा लागवडा नाही. आता बांबू लागवड तोडीस आला असून त्याचाही फायदा सदर लाभार्थ्याला होणार आहे.

सिंचन विहीर

JSV – भागोजी संतू धुमाळे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षा मध्ये सिंचन विहीर काम मंजुर झाले होते, रोहयो कार्यालयाकडील कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर प्रथम काम सुरु करण्यापुर्वी भुवन नरेगा ॲप मध्ये ( Geo Tag ) रिकामी जागेचा फोटो काढणेत आला, त्यानंतर काम मागणी प्रमाणे मस्टर काढणेत आले. दिनांक- पासून सिंचन विहीर खुदाईस सुरुवात झाली व सदर खुदाई काम दिनांक- रोजी पूर्ण झाले. खुदाई काम पूर्ण झालेनंत विहीरीचे बांधकाम करणेत आले. नरेगा अंतर्गत कामासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळाले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहीर कामाकरीता ४०००००/- रुपयांचे अनुदान मिळाले योजनेचा लाभ नरेगा अंतर्गत मिळाला व सदरच्या लाभामुळे आज लाभार्थी बहुपीक घेत आहेत. त्यामुळे सदर लाभार्थीला जादा उत्पन्न मिळू लागले. फक्त पावासाच्या पाण्यावर अवलंबून न राहता आपण कधीही म्हणजेच बारमाही पिक घेवू शकतो, हा आत्मविश्वास जागा झाला. तसेच लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावत आहे.

Block Plantation

तुती लागवड रेशीम किटक संगोपन करणे वर्ष 2020-2021

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे गावामध्ये तसेच शेती व्यवसायामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या ऊस, मका,सोयाबीन,भुईमूग या पिकांना फाटा देऊन रेशीम संगोपन व तुती लागवड केल्यामुळे नवीन व्यवसाय निर्मिती करता आली. रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने जमीन सुपीकतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे. रेशीम कोष उत्पादनातुन प्रत्येक वर्षी ८ बँच घेतल्या आहेत.प्रत्येक बँच मधुन १०० अंडी पुंज्यसाठी ६५ ते ८५ किलो कोष उत्पादन मिळाले आहे .व प्रत्येक बँचसाठी खर्च वजा जाता ४५ ते ५० हजार - इतकी रक्कम नफा स्वरुपात मिळत आहे. अशा पध्दतीने तुती लागवड हा व्यवसाय चांगला असुन इतर शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

gadhinglaj (2)

सिंचन विहिर

संगाप्पा मल्लपा जोडगुदरी रा. बसरगे यांची सिंचन विहिर

ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना मनरेगा अंतर्गत सर्व योजनाची माहिती मिळाली. पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे. शेतकरी बारमाही पिक ऊस घेतच आहेत. त्याच बरोबर त्यांना उन्हाळी पालेभाज्या पण घेता येत आहेत. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढून आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. फक्त पावासाच्या पाण्यावर अवलंबून न राहता आपण कधीही म्हणजेच बारमाही पिक घेवू शकतो, हा आत्मविश्वास जागा झाला. तसेच लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावत आहे

सिंचन विहीर

JSV – बाळासो बापू परमाज सिंचन विहीर खुदाई

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षा मध्ये सिंचन विहीर काम मंजुर झाले होते, रोहयो कार्यालयाकडील कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर प्रथम काम सुरु करण्यापुर्वी भुवन नरेगा ॲप मध्ये ( Geo Tag ) रिकामी जागेचा फोटो काढणेत आला, त्यानंतर काम मागणी प्रमाणे मस्टर काढणेत आले. दिनांक- 22/11/2023 पासून सिंचन विहीर खुदाईस सुरुवात झाली व सदर खुदाई काम दिनांक- 28/03/2024 रोजी पूर्ण झाले. खुदाई काम पूर्ण झालेनंत विहीरीचे बांधकाम करणेत आले. नरेगा अंतर्गत कामासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळाले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहीर कामाकरीता ४०००००/- रुपयांचे अनुदान मिळाले योजनेचा लाभ नरेगा अंतर्गत मिळाला व सदरच्या लाभामुळे आज लाभार्थी बहुपीक घेत आहेत. त्यामुळे सदर लाभार्थीला जादा उत्पन्न मिळू लागले.

वैयक्तिक सिंचन विहीर

JSV उदय बाळकु पाटील यांची सिंचन विहीर करनूर वर्ष :- 2024-25

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर कामाकरीता 4 लाख रूपयांचे अनुदान मिळाले.सदर लाभामुळे आज लाभार्थी बहूपीक घेत आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे.

RC मौजे आणूर ता.कागल येथे सिमेंट रस्ता तयार करणे

वर्ष :- 2024-25

RC मौजे आणूर ता.कागल येथे सिमेंट रस्ता तयार करणे हे काम मनरेगा मधून मंजूर झाले.सदर कामामुळे गावातील लोकांना रोजगार उपलब्धं झाला.तसेच वाहतुकीसाठी चांगला मार्ग तयार झाला.

bele toilet1

बेले येथे प्राथमिक शाळेमध्ये शौचालय बांधकाम करणे

वर्ष 2020-2021

प्राथमिक शाळेला शौचालय नसल्यामुळे नैसर्गिक विधीसाठी शाळेतील विद्यार्थी उघड्यावर जात असत.त्यामुळे शाळेभोवती अस्वच्छतेचे प्रमाण वाढून दुर्गधी व डांसाचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शौचालय उपलब्ध झालेने शाळेतील विद्यार्थ्यांचा मुलभूत प्रश्न मार्गी लागला असून शाळेचा परिसर दुर्गंधी मुक्त झाला आहे. खास करून मुलींना याचा ज्यास्त फायदा झालेला असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

tuti1

Block Plantation

बेले येथे राजाराम नामदेव लोंबोरे यांचे तुती लागवड करणे वर्ष 2020-2021

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे गावामध्ये तसेच शेती व्यवसायामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या ऊस, मका,सोयाबीन,भुईमूग या पिकांना फाटा देऊन रेशीम संगोपन व तुती लागवड केल्यामुळे नवीन व्यवसाय निर्मिती करता आली. रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने जमीन सुपीकतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली आहे. रेशीम कोष उत्पादनातुन प्रत्येक वर्षी ८ बँच घेतल्या आहेत.प्रत्येक बँच मधुन १०० अंडी पुंज्यसाठी ६५ ते ८५ किलो कोष उत्पादन मिळाले आहे .व प्रत्येक बँचसाठी खर्च वजा जाता ४५ ते ५० हजार - इतकी रक्कम नफा स्वरुपात मिळत आहे. अशा पध्दतीने तुती लागवड हा व्यवसाय चांगला असुन इतर शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Construction of Cattle Shelter for Individuals

श्री. यशवंत महादेव कवडे रा. आवळी बु ता. राधानगरी याचे जनावराचा गोठा शेड बांधणे वर्ष - 2023-2024

मुक्तसंचार गोठ्यात मजूर आणि चारा व्यवस्थापनावर खर्च कमी होतो आणि निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो. मुक्तसंचार गोठ्यात जनावरांना चारा खाण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि त्यांना विश्रांती घेण्यासाठीही जास्त वेळ मिळतो. यामुळे त्यांची अन्नद्रव्यांची पाचकता वाढते आणि दूध उत्पादनासाठी अन्नद्रव्ये कार्यक्षमतेने वापरली जातात. मुक्तसंचार जनावरांच्या गोठ्या मुळे थंडी , सूर्यप्रकाश , पाऊस व वाऱ्या पासून संरक्षण मिळते. जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि खनिजयुक्त चाटण विटा ठेवण्यासाठी गोठ्यामध्ये वेगळी सोय केलेली असते. गायी आणि म्हैस विश्रांती घेतात आणि रवंथ करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातील अन्नद्रव्यांची पाचकता वाढते. यामुळे त्यांच्या शरीरातील अन्नद्रव्ये दूध उत्पादनासाठी कार्यक्षमतेने वापरली जातात आणि वासरांची वाढ जलद होते.

पेवर ब्लॉक

मारुती सखाराम पाटील घर ते बाबुराव पाटील वर्ष - 2023-2024 ग्रामपंचायत- शित्तुर तर्फ मलकापुर , तालुका –शाहूवाडी

सिंचन विहीर

श्री सखाराम विठ्ठल कोळपटे रा. खोतवाडी

पडीक जमीन सुपीक झाली उत्पादन मधी वाड झाली माझ्या भागात दुष्काळ असल्यानं विहीर बांधल्यामुळे जमीनत उत्पादन चालू झाले.

सिंचन विहीर

श्री यासीन काशीम मुजावर रा. तमदलगे ता . शिरोळ वर्ष – २०२३-२०२४

माझा भागात दुष्यकाळ असल्याने मला पाणी मिळाले. पाणी मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली. बार माही पिके घेता आली . माझ्या शेतात विहीर घेतली आणि जीवनात प्रगती झाली . पडीक जमीन सुपीक झाली. आर्थीक प्रगती झाली .

फळबाग

श्री. जिन्नाप्पा मालगावे रा , बुबनाल ता . शिरोळ वर्ष २०२४-२०२५

५४ ते ५५ किलो घड झाला आहे . आथिक प्रगती झाली उत्पादनात वाढ झाली बाहेर च्या देशामध्ये विक्रीसाठी गेला आहे.