बंद

महत्वाची ठिकाणे

महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोल्हापूर जिल्हा आहे. मुख्य शहर असलेले कोल्हापूर शहर हे एक प्राचीन शहर आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या तीरावर आहे, त्याला दक्षिण काशी कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या छात्रछायेमध्ये वसले आहे आणि त्याला पुराणामध्ये एक शक्तिपीठ म्हणुन संबोधले जाते. पुरातन काळात कोल्हापूरावर शिलहरा, यादव, राष्ट्रकुट आणि चालुक्य यांनी राज्य केले. सुधारीत पध्दतीने जिल्ह्याची झालेली वाढ आकर्षित आहे. छत्रपती शाहु महाराज हे एक कोल्हापूरची बांधणी व सुधारीत कोल्हापूर बनवणारे दातक आहेत. हा जिल्हा नैसर्गिक संपत्ती- पाणी, जमीन, नैसर्गिक भाजीपाला, जनावरे आणि खनिजांनी समृध्द आहे. परिणामी, कोल्हापूर जिल्हा शेती व्यवसायामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अग्रेसर आहे. आत्ता हा जिल्हा घाईने औद्योगिकतेकडे वळत आहे आणि आगोदरच शेती औद्योगिकतेमध्ये हा जिल्हा अग्रेसर आहे. भारतातील सहकार चळवळीचे कोल्हापूर जिल्हा हा एक चमकत उदाहरण आहे.

हा जिल्हा ऊत्पन्नामध्ये सर्वात अग्रेसर आहे ह्यात काही, संशय नाही आणि तसेच तो देशामध्ये देखील ऊत्पन्नामध्ये अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्हा हा सांस्कृतिकरित्या सुधारलेला आहे परिणामता ह्याचा इतिहास खूप चांगला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ऊज्ज्वल यश प्राप्त करणार्‍या लोकांमध्ये हा जिल्हा अग्रेसर आहे. देशामध्ये कोल्हापूर शहर कोल्हापूरी खास मध्ये प्रसिध्द आहे.