जिल्ह्याविषयी
कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून सह्याद्री पर्वत रांगा सभोवताली आहेत. हे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यासाठी प्रसिद्ध शहर आहे. भारताची वैभवता आणि भव्यता शोधण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
कोल्हापूर हे भारताच्या आर्थिक राजधानी मुंबई पासून सुमारे 387 कि.मी. अंतरावर आहे. भारतीय हस्तकलेच्या चामड्यांच्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल आणि तिच्या स्थानिक दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध असून त्यापैकी कोल्हापुरी साज नावाचा हार विशेष प्रसिद्ध आहे.
समुद्र सपाटीपासून 1900 फूटाच्या उंचीवर असलेल्या कोल्हापूरला ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा काळ पर्यटनासाठी उत्तम असून इतरही कालावधीत कोल्हापूरचे हवामान आल्हाददायी असते.
मराठी ही कोल्हापूरची मातृभाषा आहे. मराठी सोबत, हिंदी आणि इंग्रजी भाषाही बोलल्या जातात. दिवाळी, गणेश चतुर्थी, नवरात्री आणि होळी यांसारखे सण मोठ्या उत्साहाने साजरा केले जातात आणि कोल्हापुरी लोक अतिशय आदरातिथ्य करणारे आणि स्वागतोत्सुक आहेत.
कोल्हापूर आधुनिक संगम
आज कोल्हापूर प्राचीन परंपरेचा व आधुनिकतेचा प्रभाव असलेला आदर्श जिल्हा आहे. नैसर्गिक स्रोतांमध्ये पाणी, सुपीक माती, खनिजे, नैसर्गिक वनस्पती आणि पशु संपत्ती यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे विकासाकडे वेगाने अग्रेसर होत आहे . हा महाराष्ट्रातील आधुनिक शेतीप्रधान जिल्ह्यांपैकी एक आहे आणि कृषी आधारित उद्योगातील आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर अभियांत्रिकी उत्पादने, रिफाइंड साखर आणि कापड उद्योगासाठी एक प्रमुख ठिकाण आहे. आज कोल्हापूर मराठी चित्रपट उद्योगासाठी देखील प्रसिद्ध असून तसेच सर्व भारतीय शहरांमध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये एक आहे.
महाराष्ट्रात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात राहणा-या उत्साही पर्यटकांसाठी आणि प्रवासी शिबिर आणि ट्रेकिंगसाठी एक दिवसाची सहल किंवा शनिवार-रविवार प्रवासाची सोय करू शकतात. संपूर्ण भारतातील आणि परदेशातील पर्यटक आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाटी आणि या भव्य शहराची समृद्धी पाहण्यासाठी कोल्हापूरची आवर्जून भेट घेतात.
कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार ते या ठिकाणांनचा आनंद घेऊ शकतात. कोल्हापूर हे बसेस, रेल्वे, आणि विमाने यांच्या माध्यमातून उत्तमरीत्या जोडले आहे त्यामुळे या सुंदर ठिकाणाची सुंदरता आणि राजेशाही शालीनता तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
भारतातील प्रमुख शहरांपासून कोल्हापूरचे अंतर-
- दिल्ली पासून 1650 किमी.
- मुंबईपासून 387 कि.मी.
- अहमदाबाद पासून 893 किमी.
- हैदराबाद पासून 539 किमी.
- चेन्नई पासून 933 किमी.