कोल्हापूर जिल्ह्या मध्ये ऊसाचे ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे हा जिल्हा गुळ ऊत्पादनामध्ये अग्रेसर आहे तसेच येथील गुळ ईतर गुळापेक्षा कमी रंगीत आहे. रंगातील अशुध्दता सहजरित्या कमी केली जाते. जुने गुळ बांधणी करणारे हे त्यांच्या बांधणीमध्ये कमी लाल – तांबुस रंग बनवण्यामध्ये निपुण असतात. हा कमी रंगीत आणि जास्त गोड असलेला हा गुळ प्रसिध्द आहे. जिथ गुळ बनवला जातो त्या ठिकाणाला गुर्हाळ म्हणतात. ह्या गुर्हाळा मध्ये पुर्वापार कालाप्रमाणे कोल्हापूरी मटण व रस्सा ह्यांचा आहार असतो.