बंद

इतिहास

कोल्हापूर हे दक्षिणेकडील प्रमुख संस्थान आहे, की जे अक्षांश 15°73’ ते  17°11’ व रेखांश 73°75’ ते 74°70’ दरम्यान पसरलेले आहे. कोल्हापूर ची समुद्र सपाटी पासूनची उंची 546 मीटर असून सह्याद्री पठाराशी सानिध्य असलेला पूर्वेकडे उताराला लागला असलेने जिल्ह्यातील वातावरण असे बनलेले आहे की जे दुष्काळ व टंचाई पासून दूर आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे वातावरण थंडही नाही व उष्णही नाही असे आल्हाददायक आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस सांगली जिल्हा, पश्चिम-उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिम-दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेस कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्हा वसलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7685 चौ.किमी. आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38,75,001 आहे.

हिंदू, जैन आणि बौद्ध यांच्यासारख्या पवित्र या अत्यंत प्राचीन राज्याचा इतिहास सहा कालावधीत विभागला जाऊ शकतो. पहिला मौर्य पध्दतीचा काळ, दुसरा आंध्र काळ, तिसरा चालुक्य-राष्ट्रकूट काळ, चौथा शिलहार-यादव काळ हे हिंदुचे प्रभुत्वाखाली इसवी सन 1347 पर्यंत चालत आले. शेवटचे दोन कालावधीमध्ये बहामणी सल्तनत-विजापूर अथवा महंमद कालावधी इसवी सन 1700 पर्यंत व मराठा कालावधी 18 वे शतकात चालत होता.  राजराम महाराज (छत्रपती शिवाजी यांचे दुसरे सुपुत्र) यांचे इसवी सन 1700 मध्ये निधन झालेनंतर, त्यांची वीर पत्नी ताराबाई, त्यांचा मुलगा दुसरा शिवाजी यांना गादीवर बसवून राज्यकारभार चालवला. मराठा साम्राज्याचे संस्थापक यांनी दिलेली अखंड श्रीमंत वारसा राखण्यासाठी त्यांचे कठोर प्रयत्न व आक्रमक लढायामुळे औरंगजेबाचे उत्तराधिकारी सुध्दा नामोहरम झाले. सुरुवातीचे काळात पन्हाळा येथे गादी चालवलेनंतर, कोल्हापूर येथून इसवी सन 1731 नंतर कोल्हापूर येझून गादी चालवणेत आली. दुसरे शिवाजी यांचेनंतर दुसरे संभाजी (1760 पर्यंत), तिसरे शिवाजी(1760-1812), शंभू (1812-1821), शहाजी(1821-1837), चौथे शिवाजी(1837-1866), दुसरे राजाराम(1866-1870), पाचवे शिवाजी(1870-1883) यांनी गादी चालवली. पाचवे शिवाजी यांचे मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहु महाराज दत्तक घेतलेनंतर शाहु महाराज यांनी गादी चालवली. त्यांनी संपूर्ण शक्तीने प्रतिभावान पध्दतीने गादी चालवली. जवळजवळ अर्ध्या शतकाच्या अल्पसंख्यांकांच्या कालावधीनंतर, गादीवर राज्यकर्त्याच्या आगमनाची केवळ राज्याच्या विषयानेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषाने स्वागत केले गेले.