बंद

कसे पोहोचाल?

पुणे येथील लोहगांव विमानतळ कोल्हापूर पासून 250 किमी वर आहेे, येथे पोहोचणे करिता 250 किमी अंतरावर बस अथवा टॅक्सीने 4 तास 15 मिनीटे लागतात.  मुंबई येथील छत्रपति शिवाजी विमानतळ कोल्हापूर पासून 380 किमी अंतरावर आहे, जिथे पोहोचायला 6 तास 15 मिनीटे लागतात.

वेळगावचे विमातळाचा पर्याय ही आहे, की जे 125 किमी अंतरावर आहे. येथे पोहोचणे साठी 2 तास 15 मिनीट लागतात. हे विमानतळ कर्नाटक राज्यात आहे.

कोल्हापूरमध्ये नवीन बनत आहे. येथून विमानाच्या फेऱ्या कमी आहेत.

 

रेल्वेने

कोल्हापूर येथून 50 किमी वरील मिरज जंक्शन द्वारा  ऊत्तरेकडे मुंबई, दिल्ली, नागपूर कडे रेल्वे जातात. पुर्वेकडे सोलापूर, हैद्राबाद कडे रेल्वे जातात. दक्षिणेकडे बंगलोर, तिरुपती रेल्वे जातात.

रस्त्याने

कोल्हापूर येथे कार्यक्षम बस स्थानक आहे. रस्त्याने प्रवासाकरिता म.रा.मा.प.मं (महाराय़्ट्र राज्य परिवहन मंडळ)चा उत्तम पर्याय आहे. कोल्हापूर हून उत्तरेकडे मुंबई, पुणे ला जाणारे रस्ते आहेत. पुर्वेकडे सांगली, सोलापूर ला जाणारे रस्ते आहेत. दक्षिणेकडे बेळगाव, बंगलोर (कर्नाटक राज्य) ला जाणारे रस्ते आहेत. पश्चिमेकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग ला जाणारे रस्ते आहेत.