बंद

शालिनी पॅलेस

1931-34 सालांमध्ये आठ लाख रूपयांत शालिनी पॅलेस बांधण्यात आला, ज्यावेळी श्रीमंत शालिनि राजे कोल्हापूरचे राजे झाले त्यावेळी ह्या राजवाड्याला शालिनी पॅलेस हे नाव देण्यात आले. रंकाळा तलावाच्या पश्चिमेला हा राजवाडा ऊभा आहे (जवळपास-2.5 मैल), आणि ह्याच्या सभोवताली बदमाची झाडे व ईतर हिरवीगार झाडी आहे. हा राजवाडा कापलेले कोने असलेल्या काळ्या दगडांपासून बांधला आहे आणि याच्या भिंतींना इटालियन मार्बल लावले आहेत व जेथुन कोल्हापूरचे राजे आत येतात ते दरवाजे बेळगावी पध्दतीच्या काचांमध्ये बसवले आहेत. भव्य काळ्या दगडाच्या कमानी आहेत आणि याचा पोर्च देखील अतिशय सुंदर आहे. काचेच्या कमानी आणि मोठे कमानी घड्याळ खांबावर आहे, त्यामुळे हा राजवाडा खूप सुंदर दिसतो. रात्रीच्या चंद्र प्रकाशामध्ये रंकाळा तलावामध्ये ह्या राजवाड्याची प्रतिमा पाण्यामध्ये ऊमटते.